सुरेश पाटील यांची घोषणा
कोल्हापूर – नव्यानेच स्थापन झालेला महाराष्ट्र क्रांती सेना पक्ष राज्यातील लोकसभेच्या 48 व विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढविणार आहे, अशी घोषणा पक्षप्रमुख सुरेश पाटील यांनी सोमवारी येथे केली. पक्षाचा पहिला मेळावा 25 नोव्हेंबरला पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे होईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली नाही तर ते महाराष्ट्र क्रांती सेनेकडून निवडणूक रिंगणात असतील अस देखील त्यांनी सांगितले. पाटील म्हणाले, रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना केली आहे. पक्षाचे मुख्य संस्थापक उदयनराजे भोसले असून, पक्षाला वेगळे वलय मिळाले आहे. पेठ वडगाव येथील मेळाव्यानंतर राधानगरी, भुदरगड, चंदगड येथेही मेळावे होतील.
मतदारांना हा पक्ष तिसरा सक्षम पर्याय वाटत आहे. पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी होऊ लागल्याने लोकसभा, विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी दिली नाही तर ते क्रांती सेनेकडून निवडणूक रिंगणात असतील.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा