शंभूराजेंच्या बदनामीच्या निषेधार्थ ‘मराठा मावळा’ रस्त्यावर

कोल्हापूर : राज्य सरकारतर्फे सर्वशिक्षा अभियानांतर्गत डॉ. शुभा साठे लिखित ‘समर्थ रामदास स्वामी’ पुस्तकातून छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापून बदनामी करण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ सकल मराठा मावळातर्फे शुक्रवारी मिरजकर तिकटी येथे या पुस्तकाच्या कव्हर फाडून तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी मावळ्यांनी लेखिकेसह मुख्यमंत्री व सरकारच्या विरोधात शेलक्या शब्दात घोषणा देत निदर्शने केली. बदनामीप्रकरणी संबंधितांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) यांच्याकडे करण्यात आली.

-Ads-

आंदोलनात उमेश पोवार, दिलीप सावंत, संदीप बोरगावे, अमोल गायकवाड, रमाकांत बिरंजे, दत्तात्रय संकपाळ यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)