‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेसाठी पुणे शहर संघ जाहीर

62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद कुस्ती व महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा

पुणे- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 62व्या वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद कुस्ती व महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा जालना येथे 19 ते 23 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुणे शहर संघाच्या खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन छत्रपती शिवाजी स्टेडीयम (मंगळवार पेठ) येथे करण्यात आले होते.महाराष्ट्र केसरी किताबासाठी गादी विभागातून गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके तर माती विभागातून साईनाथ रानवडे हे लढणार आहेत. राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव बुचडे यांनी पुणे शहर संघ जाहीर केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे शहर संघ – माती विभाग

57 किलो : किरण शिंदे (गोकुळ वस्ताद तालीम)
61 किलो : निखील कदम (गोकुळ वस्ताद तालीम)
65 किलो : रावसाहेब घोरपडे (सह्याद्री संकुल)
70 किलो : अमर मते (हनुमान आखाडा)
74 किलो : मंगेश दोरगे (खालकर तालीम)
79 किलो : निखील उंद्रे (सह्याद्री संकुल)
86 किलो : प्रदीप बेंद्रे (हिंदकेसरी आखाडा)
92 किलो : हेमंत माझिरे (कुंजीर तालीम)
97 किलो : दत्ता ठोंबरे (चिंचेची तालीम)
महाराष्ट्र केसरी 86 ते 125 किलो : साईनाथ रानवडे (मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल)

पुणे शहर संघ : गादी विभाग

57 किलो : भालचंद्र कुंभार (हनुमान आखाडा)
61 किलो : अनुदान चव्हाण (सह्याद्री संकुल)
65 किलो : सागर खोपडे (मुकुंद व्यायामशाळा)
70 किलो : शुभम थोरात (शिवरामदादा तालीम)
74 किलो : रवींद्र जगताप (गुलसे तालीम)
79 किलो : वैभव तांगडे (हनुमान आखाडा)
86 किलो : अमित पवळे (हनुमान आखाडा)
92 किलो : अक्षय भोसले (शिवरामदादा तालीम)
97 किलो : चेतन कंधारे (सह्याद्री संकुल)
महाराष्ट्र केसरी 86 ते 125 किलो : अभिजित कटके (शिवरामदादा तालीम)

यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक विलास कथुरे, माजी ऑलंम्पियन मारुती आडकर, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, हिंदकेसरी अमोल बराटे, राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, राष्ट्रीय तालीम संघाचे कार्याध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, सचिव शिवाजीराव बुचडे, खजिनदार मधुकर फडतरे, सहसचिव गणेश दांगट, हेमेद्र किराड, अविनाश टकले, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव मोहन खोपडे, उपमहाराष्ट्र केसरी संतोष गरुड, पुणे शहराचे पंच प्रमुख रवी बोत्रे, राष्ट्रीय तालीम संघाचे कार्यकारिणी सदस्य निवृती मारणे, शामराव यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)