व्यापार सुलभतेबाबत ‘महाराष्ट्र’ 13 व्या स्थानावर

नवी दिल्ली : व्यापार सुधारणा कृती आराखडा 2016 मधील अंमलबजावणी गुणांनुसार 16 राज्यांनी 340 सुधारणांपैकी 75 टक्‍के किंवा त्यापेक्षा अधिक अंमलबजावणी केली आहे. व्यापार सुधारणा कृती आराखडा 2017-18 मध्ये 18 राज्यांनी 75 टक्‍क्‍यांहून अधिक सामायिक गुण (सुधारणा पुरावा गुण आणि फीडबॅक स्कोर) प्राप्त केले आहेत.

क्रमवारीत आंध्र प्रदेश 98.30 टक्‍के गुणांसह पहिल्यास्थानी, तेलंगण 98.20 टक्‍के गुणांसह दुसऱ्या स्थानी तर हरियाणा 98.06 टक्‍के गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. एकूण 9 राज्यांनी 95 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

6 राज्ये 90-95 टक्‍के क्रमवारीत आहेत. 92.88 टक्‍क्‍यांसह महाराष्ट्र 13 व्या स्थानी आहे. वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)