महाराष्ट्रात लवकरच राजकिय भूकंप : चंद्रकांत पाटलांचे संकेत

संग्रहित छायाचित्र

मुंबई (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकिय नेत्याच्या पक्षांतराला जोर चढला असतानाच येत्या आठ दिवसांत महाराष्ट्रात मोठे राजकिय भूकंप होणार असल्याचे संकेत भाजपाचे ज्येष्ठ नेते व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. तसेच इतर पक्षांनी आता आपली ताकद आणि पैसा 2024च्या निवडणुकीसाठीच वाचवून ठेवावे. हे जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे मत खरे होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

कॉंग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील बोलत होते. महाराष्ट्रात येत्या आठ दिवसांत अनेक मोठे राजकीय भूकंप होणार आहेत.

जम्मू-काश्‍मिरमधील नेते ओमर अब्दुल्ला यांनी आपल्या वडिलांना 2019च्या निवडणुकीसाठी पक्षाचा वेळ आणि पैसा खर्च करून काहीच उपयोग नाही. तो 2024 साठी वाचवून ठेवावा, असा सल्ला दिला आहे. तो खराच आहे. कारण 2019ची निवडणूक देखील पूर्णपणे भाजपा, रालोआच्याच बाजूने असणार आहे. त्यामुळे इतर पक्षांनी जास्त त्रास घेउ नये ,असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)