महाराष्ट्र क्‍लोज्ड्‌ स्क्‍वॅश अजिंक्‍यपद स्पर्धा : अलिना, सानिका यांना जेतेपद

पुणे – महाराष्ट्र स्क्‍वॅश रॅकेटस्‌ असोसिएशन (एमएसआरए) तर्फे आयोजित महाराष्ट्र क्‍लोज्ड्‌ स्क्‍वॅश अजिंक्‍यपद स्पर्धेत पुण्याच्या अर्णव सरीन, रौनक सिंग तसेच अलिना शहा व सानिका चौधरी यांनी आपापल्या गटाचे विजेतेपद मिळवले.
या स्पर्धा आयस्क्‍वॅश ऍकॅडमी, मुंढवा येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या पुरूष गटाच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित अभिनव सिन्हा याने सातव्या मानांकित सिमरनजीत सिंग याचा 11-4, 11-3, 11-2 असा पराभव केला.

महिला गटाच्या अंतिम फेरीत अग्रमानांकित सानिका चौधरीने दुसऱ्या मानांकित निकीता अगरवाल हिचा 11-3, 11-1, 11-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. इशान दाबके, काव्य आनंद, पार्थ अंबानी, रौनक सिंग, अर्णव सरीन यांनी अनुक्रमे 11, 13, 15, 17, 19 वर्षांखालील मुलांच्या, तर एलिना शहा, तिशा जसानी, सोनया बजाज, तनिष्का जैन, अवनी नगर यांनी यांनी अनुक्रमे 11, 13, 15, 17, 19 वर्षांखालील मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळविले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य अन्न आयोगचे अध्यक्ष अरूण देशपांडे, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. लेजंडस्‌ स्पोर्टस्‌ क्‍लबचे संचालक संदीप कोद्रे, महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे सरचिटणीस डॉ. ए. ध्यानचंद कुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, डॉ. प्रदीप खांडरे, पीएसआरएचे सरचिटणीस आनंद लाहोटी आणि पीएसआरए अध्यक्ष कालिदास मगर यांच्या उपस्थित करण्यात आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)