पुणे – खाउमन सिंग भाटी या बिगर मानांकित खेळाडूने पाचव्या मानांकित निखील जैन याचा पराभव करून येथे होत असलेल्या महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेटस् असोसिएशन (एमएसआरए) तर्फे आयोजित महाराष्ट्र क्लोज्ड् स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरूष गटात सनसनाटी विजय मिळवला. तर, इतर सामन्यांमध्ये आयस्क्वॅश ऍकॅडमी, मुंढवा येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मानांकित खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून आगेकूच केली.
यावेळी झालेल्या 17 वर्षीय मुलांच्या गटातील सामन्यात आयुष दागवरने चिन्मय डोंगरकरचा 13-11, 11-9, 11-2 असा सहज पराभव केला. तर, ऋत्व सामंतने सिध्दांत येंढेचा 11-1, 11-1, 11-3 असा एकतर्फी पराभव करत आगेकूच केली. यावेळी झालेल्या 15 वर्षीय मुलांच्या सामन्यात प्रविण सानप, लक्ष मोतीयल, क्रिष डेम्ब्ला, हुनरपाल कोहली, कबिर तारापोरेवाला, जिश्नु ठक्केर, आर्य बेजलवार, करण पटेल, विशाल बेईस, प्रणित दुवा यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत आगेकूच नोंदवली.