महाराष्ट्रात 9 ते 15 ऑक्‍टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह 

मुंबई: जागतिक टपाल दिनानिमित्त टपाल विभाग 9 ते 15 ऑक्‍टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करत आहेत. महाराष्ट्रातील 1293 टपाल कार्यालये आधार केंद्र म्हणून काम करत असून त्यांनी आतापर्यंत 50,594 वैयक्तिक आधार क्रमांक जारी केले असून 4 लाखांहून अधिक आधारक्रमांकांचे अद्ययावतीकरण केले आहे, असे महाराष्ट्र परिमंडळाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच.सी.अगरवाल यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. 16 टपाल कार्यालये पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र म्हणून काम करत असून पासपोर्टसंबंधी सेवा पुरवतात.
अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेने महाराष्ट्र परिमंडळात आतापर्यंत 78 हजार खाती उघडली आहेत. आपल्या उद्योगाचा विस्तार करण्यासाठी टपाल कार्यालयाने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. (एमएसईडीसीएल) आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या सहकार्याने आतापर्यंत 32 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे.
टपाल कार्यालयाने महाराष्ट्र परिमंडळात कोअर बॅंकिंग सोल्यूशन, एटीएम, कोअर सिस्टीम इंटिग्रेशन, कोअर इंन्शुरन्स सोल्यूशन आणि दर्पणसंबंधी तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहानिमित्त महाराष्ट्र परिमंडळाने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि गोवा येथे खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)