मुंबई :- राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
आज जाहीर झालेल्या खातेवाटपात भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी 6 आणि शिवसेनेकडे (शिंदे गट) असलेली 3 खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मंत्र्यांना मिळाली आहेत.
जाणून घ्या..राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणाची खाती…
BJP कडून NCP कडे..
1.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थखाते होते ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.
त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
2.भाजपच्या अतुल सावे यांच्याकडे असलेले सहकार खाते हे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आले आहे.त्यानंतर आता अतुल मोरेश्वर सावें यांच्याकडे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण हे खाते राहील.
3.भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे असलेले वैद्यकीय शिक्षण खाते हसन मुश्रीफ यांना देण्यात आले आहे.त्यानंतर आता गिरीष महाजन यांच्याकडे ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन हे खाते राहील.
4.भाजपचे रविंद्र चव्हाण यांच्याकङे असलेले अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खाते हे आता छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. त्यानंतर आता रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांच्याकङे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)हे खाते राहील.
5. भाजपचे मंगलप्रभात लोढा यांच्याकङे असलेले महिला आणि बालविकास खाते हे अदिती तटकरे यांना देण्यात आले असून मंगलप्रभात लोढा यांच्याकङे आता कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता हे खाते राहील.
6. भाजपचे गिरीश महाजन यांच्याकङे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण हे खाते संजय बनसोडे यांना देण्यात आलं आहे. महाजन यांच्याकङे ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन हे खाते राहील.
Shivsena कडून NCP कङे…
1. शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांच्याकडे असलेले कृषी खाते धनंजय मुंडे यांना देण्यात आलं आहे. त्याबदली अब्दुल सत्तारांना अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन खातं देण्यात आलं आहे.
2. शिवसेनेचे संजय राठोड यांच्याकडे असलेले अन्न आणि औषध प्रशासन खाते धर्मराव अत्राम यांना देण्यात आलं आहे. त्याबदली संजय राठोड यांना मृद व जलसंधारण खातं देण्यात आलं आहे.
3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिवसेना)यांच्याकडे असलेले मदत आणि पुनवर्सन खाते अनिल पाटील यांना देण्यात आलं आहे.
फेरबदलानंतर राज्य मंत्रिमंडळ खालीलप्रमाणे –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे :- यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :- यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार :- यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे :-
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
सुरेश दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
आदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.