भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा यांच्यावरील नजरकैद उठवली

नवी दिल्ली – दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने मावनाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यावरील नजरकैद उठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांची ट्रांजिट रिमांड संबंधीची याचिका रद्द करत त्यांच्यावरील नजरकैद हटविण्याचा आज निर्णय सुनावला आहे.

आजच्या या निर्णयाची सुनावणी करत्यावेळी म्हटले की, नवलखा यांची पोलीस कस्टडी ही 24 तासांपर्यत वाढविण्यात आली आहे पण त्याच्यात आणखी वाढ करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

-Ads-

दरम्यान भीमा-कोरेगावमध्ये 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी करताना पुणे पोलिसांनी  28 ऑगस्टला गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वरवर राव आणि वरनॉन गोन्साल्वीस याना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ताब्यात घेतले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटक न करता त्यांना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.

मागील महिन्यांच्या 29 आॅगस्टपासून वरवरा राव, अरूण फरेरा, सुधा भारव्दाज, वरनाॅन गोंसाल्विस आणि गौतम नवलखा हे 5 जण स्वतच्या घरात नजरकैदेत आहेत. यापैकी नवलखा यांची नजरकैद आज हटविण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)