महाराष्ट्रात हुक्काबंदीवर शिक्कामोर्तब 

संग्रहित छायाचित्र
– बंदीच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींची मोहोर 
– महाराष्ट्र ठरले देशातील दुसरे राज्य 
– उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंतची कैद व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड 
मुंबई: युवा पिढीला नशेच्या विळख्यात ओढणा-या हुक्का पार्लरवर महाराष्ट्रात संपूर्णपणे बंदी घालण्याच्या निर्णायावर शिक्कामोर्तब झाले आहे. हुक्का पार्लरवरच्या बंदीच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी सही केल्याने आता हुक्का पार्लरना टाळे लागणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास तीन वर्षांपर्यंतची कैद व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गुजरात पाठोपाठ हुक्का पार्लरवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे.
हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबत विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यावर गुरुवारी अध्यादेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे हुक्का पार्लर बंदीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हुक्का पार्लरचे पेव फुटले आहे. वेगवेगळ्या फ्लेव्हर्सच्या नावाखाली हुक्का ओढला जात होता. तरुण पिढी हुक्क्‌याच्या आहारी गेली होती. यामुळे युवा पिढीच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. केवळ श्रीमंतांचीच नव्हे तर मध्यमवर्गीयांची मुले व मुलीही हुक्क्‌याच्या आहारी गेल्या होत्या. त्यामुळे हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हुक्का पार्लर सुरु आहेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)