महाराष्ट्र बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी ए. एस. राजीव 

पुणे: ए. एस. राजीव यांनी बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 2 डिसेंबर रोजी कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते इंडियन बॅंकेचे कार्यकारी संचालक होते.

राजीव यांना सिंडिकेट बॅंक, विजया बॅंक आणि इंडियन बॅंकमधील सुमारे तीन दशके व्यावसायिक बॅंकिंगचा अनुभव आहे. चार्टर्ड अकाउंटंट असण्यासोबतच त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय बॅंकिंग, जोखीम व्यवस्थापन, क्रेडिट देखरेख व पर्यवेक्षण, मानव संसाधन, दक्षता, कॉर्पोरेट प्रशासन, तपासणी व लेखापरीक्षण, सायबर सुरक्षा, वित्त, खाती आणि कर यासह बॅंकिंगच्या सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये विस्तृत अनुभव आणि कौशल्य आहे. ए. एस. राजीव हे गणित पदवीधर असून सोबतच एफसीए, एमबीए, डीआयएसए आणि सीएआयआयबी पात्र आहेत.

सार्वजनिक क्षेत्रात्रील झपाट्याने प्रगती करणाऱ्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या 1800 पेक्षा अधिक शाखा 1800 पेक्षा अधिक एटीएम्स्‌ आहेत. बॅंक इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल बॅंकिंग याद्वारे देशभरातील अडीच कोटींपेक्षा आधिक ग्राहकांच्या सेवेत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)