महाराष्ट्र बॅंकेला झाला तब्बल 1119 कोटींचा तोटा

पुणे: महाराष्ट्र बॅंकेला वाढलेल्या अनुत्पादक मालमत्तेपाटी मोठी तरतूद करावी लागल्यामुळे पहिल्या तिमाहीत 1119 कोटी रुपयांच्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेला याच कारणामुळे 412 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आता या तोट्यात तिपटीने वाढ झाली आहे. या तिमाहीत बॅंकेला अनुत्पादक मालमत्तेपोटी 1510 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी बॅंकेला यासाठी 1157 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली होती.

या तिमाहीत बॅंकेचे एकूण उत्पन्न कमी होऊन 2984 कोटी रुपये झाले आहे. जे की, गेल्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 3209 कोटी रुपये इतके होते. बॅंकेचे व्याजातून मिळणारे उत्पन्न 4 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 2640 कोटी रुपये इतके झाले आहे. जे की, गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत 2744 कोटी रुपये इतके होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जून अखेरीस बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता मोठ्या प्रमाणात वाढून 21.18 टक्‍के इतकी झाली आहे. गेल्या वर्षी जून अखेरीस बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 18.59 टक्‍के इतकी होती. आकड्यात जून अखेरीस ढोबल अनुत्पादक मालमत्ता 17800 कोटी रुपयांवर गेली आहे. गेल्या वर्षी जून अखेरीस ती 18049 कोटी रुपये इतकी होती.

बॅंकेने वसुलीवर भर दिल्यामुळे बॅंकेच्या निव्वळ अनुत्पादक मालमत्तेत घट होऊन ती 12.20 टक्‍के झाली आहे. जी की, गेल्या वर्षी 12.48 टक्‍के इतकी होती.

बॅंकेचे कार्यकारी संचालक ए सी राऊत यावेळी बोलताना म्हणाले की, वसुली आणि मालमत्तेची गुणवत्ता सुधारण्यावर प्रामुख्याने बॅंकेने लक्ष केंद्रित केलेले आहे. जून-2018 ला संपलेल्या तिमाही अखेरीस बॅंकेने रुपये 858 कोटी रुपयांच्या थकित कर्जाची वसुली केली आहे. याच काळात गतवर्षीच्या तुलनेत निव्वळ व्याज उत्पन्नामध्ये 23.92 टक्‍क्‍याची वृद्धी बॅंकेने केली आहे. कर्जाच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे ही परिणामकारक वसुली शक्‍य झाली आहे.
बॅंकेच्या आगामी विकास योजनेसंदर्भात बोलताना राऊत म्हणाले, आम्ही कर्ज विविधीकरणासाठी रिटेल, कृषी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून आमच्या मालमत्ता विभागाच्या पुनर्संतुलनाच्या प्रक्रियेमधे आहोत. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांसाठी भारत सरकारद्वारा सुरू केलेल्या सुधारणा कार्यक्रमांकरिता आमची बॅंक वचनबद्ध आहे आणि आगामी तिमाहीमध्ये त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील.

या घटनाक्रमाचा महाराष्ट्र बॅंकेच्या शेअरच्या भावावर आज परिणाम दिसून आला. बाजार बंद होताना या बॅंकेच्या शेअरचा भाव कालच्या तुलनेत दोन टक्‍क्‍यांनी कमी झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)