महाराष्ट्र बॅंकेची शेतकऱ्यांना मदत 

पुणे: बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे दिनांक 28 जुलै रोजी राज्यामधील बॅंकेच्या 741 ग्रामीण व अर्धशहरी शाखांमार्फत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यातील शेतकऱ्यांना बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी कृषी कर्जाव्यतिरिक्‍त गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, यासारख्या किरकोळ (रिटेल) कर्जाबरोबरच मुद्रा कर्ज तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांमधील प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, अटल पेन्शन योजनांविषयी मेळाव्यामधे चर्चा करून माहिती देण्यात आली.
मेळाव्यामधेच काही निवडक शेतकऱ्यांना ताबडतोब कर्ज मंजुरी पत्र दिली गेली. राज्यातील सर्व भागातील शेतकऱ्यांकडून बॅंकेस उत्तम प्रतिसाद मिळाला. या अभियानामध्ये 50,000 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला ज्यात रु.180.00 कोटीच्या जवळपास 20,000 कर्ज अर्ज प्राप्त झाले. अभियानावेळी पीककर्जासाठी 10,000 शेतकऱ्यांना त्याचवेळी रु. 85.00 कोटी रुपयांचे सैद्धांतिक मंजुरी पत्रे दिली गेली. यापुढेही भविष्यात बॅंकेमार्फत असेच उपक्रम चालू राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)