सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना ‘बेबी केअर किट’

मुंबई – आंध्र प्रदेश, तामिळनाडू व तेलंगणा या राज्यांपाठोपाठ आता महाराष्ट्रातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बालकांना दोन हजार रूपये किमतीचे “बेबी केअर कीट’ दिले जाणार आहे.

राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ही एक उपाययोजना असून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली. या योजनेचा लाभ पहिल्या प्रसूतीसाठीच मिळणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बालमृत्यू रोखण्यासाठी विविध विकसित देश अनेकविध उपाययोजना करीत असून त्यामध्ये बेबी केअर कीटचाही समावेश आहे. राज्यात सर्वसाधारणपणे वर्षाला वीस लाख महिला प्रसूत होत असतात. त्यापैकी आठ लाख महिला शहरी भागात व बारा लाख महिला आदिवासी-ग्रामीण भागातील असतात.

शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय रुग्णालयात प्रसुती होणाऱ्या महिलांची संख्या दहा लाखाच्या आसपास आहे. पहिल्या प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या सर्वसाधारणपणे चार लाखाच्या आसपास आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)