महाराष्ट्र एटीएसने सनातन संस्थेशी संबंधित वैभव राऊतला केली अटक

मुंबई – मुंबईतील नालासपोरामध्ये महाराष्ट्र एटीएस ( ATS ) ने सनातन संस्थेशी संबंधीत पदाधिकारी वैभव राऊत याला अटक केली आहे. एटीसच्या सूत्रांच्या माहितीनुसार वैभव राऊत याच्या घरात 8 देशी बाॅम्ब देखील सापडले आहेत.

वैभव राऊत याच्या घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या त्याच्या दुकानात बाॅम्ब बनविण्यासाठी लागणारे सामान देखील मिळाल्याची माहिती समोर येत आहे. अजूनपर्यत यासंबंधी एटीएस कडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. एटीएस सूत्रांच्यानुसार मागील काही दिवसापासून ते वैभववर पाळत ठेऊन होते.

तर हिंदू जनजागृति समिती ने वैभव राऊतच्या अटकेस मालेगांव पार्ट-2 असे म्हटले आहे. वैभव राऊतचा वकील संजीव पुनालेकरांचे म्हणणे आहे की, एटीएस ने अजूनपर्यत कुंटुंबाला कोणतीही सूचना दिलेली नाही आणि कोणताही पंचनामा केलेला नाही. कायदेशीर मदत मिळणे त्याचा हक्क आहे परंतु त्याला त्यापासून दूर ठेवले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)