दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील : चंद्रकांत पाटील  

कोल्हापूर : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील,अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंणगले तालुक्यातील कासारवाडी, मनपाडळे,लक्ष्मीवाडी,तारदाळ आणि माले या 5 गावांना महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी केली तसेच टंचाईबाबत गावकऱ्यांशी चर्चा करुन अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर तारदाळ येथे आयोजित कार्यक्रमत ते बोलत होते.

त्याच्यासमवेत आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार सुरेश हाळवणकर, पी.डी. पाटील, जिल्हा व सदस्य अरुण इंगवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, तहसिलदार सुधाकर भोसले,गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, तालुका कृषि अधिकारी व्ही. व्ही. देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नसून शासन त्यांना सर्वती मदत करण्यात सक्रीय राहील अशी ग्वाही देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘पिकांच्या उत्पादनातील घटीची शासनस्तरावर निश्चित दखल घेतली जाईल. त्यानुसार आवश्यक उपाययोजना केल्या जातील. मात्र मार्च नंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता गृहीत धरुण पाणी पुरवठा योजनाची गावनिहाय वस्तूस्थिती जाणून घेऊन पाण्याचे नवनवे स्त्रोत शोधून काढून त्याच्या बळकटीकरणावर विशेष भर दिला जाईल.

गावातील पाणीपुरवठा योजनांचा दर महिन्याला यंत्रणांनी आढावा घ्यावा.पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनाना प्राधान्य देण्याबरोबरच दिर्घ कालीन उपाययोजनांचेही नियोजन करा,अशी सूचनाही त्यांनी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)