#भारतबंद : इंधन दरवाढीविरोधात राज्यभर ‘मनसे’ आक्रमक  

मुंबई – इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. भारतबंदची हाक जरी काॅंग्रेस पक्षाने दिली असली तरी महाराष्ट्रात रस्त्यात उतरून आंदोलन करण्यात मनसेने बाजी मारली.

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधातील ‘भारत बंद’ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असल्याचा कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहिर केले होते. त्यानंतर राज ठाकरे यांच्या आदेशानंतर आज राज्यात मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करत इंधन दरवाढीविरोधात भाजप सरकारचा निषेध केला.

महाराष्ट्रात मुंबई, प्रभादेवी, बोरिवली, डोंबिवली, भांडूप,  पिंपरी-चिंचवड, पुणे या शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंधनदरवाढीविरोधात सुरु असलेल्या भारत बंद मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकपणे उतरली आहे.

पालघर येथील आक्रमक महाराष्ट्र सैनिक
प्रभादेवी येथे निदर्शनं करताना पोलिसांनी पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांना अटक केली.
महाराष्ट्र सैनिकांनी नागपुरात माननीय मुख्यमंत्र्यांच्या घराच्या परिसरातच निदर्शनं केली.
पेट्रोल व डिझेल व माहागाईच्या दरवाढीच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरात मनसेकडून तीव्र आंदोलन करण्यात आले.
बोरिवली येथे महाराष्ट्र सैनिकांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा विरोध सायकल आणि घोडागाडी चालवत केला.
पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात मुंबईतील दिंडोशी-गोरेगाव परिसरात महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरले.
नवी मुंबईत महाराष्ट्र सैनिकांनी एपीएमसी मार्केट मधील व्यवहार बंद पाडले यावेळी कार्यकर्ते हात जोडून विनंती करत होते.
पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात मुंबईत महाराष्ट्र सैनिकांनी मेट्रो वाहतूक रोखली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)