महार रेजिमेंटच्या शौर्याची परंपरा प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रेजिमेंटचे गौरव स्मृती संग्रहालय उभारणार

शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबई: महार रेजिमेंटला शौर्याची थोर परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आजपर्यंत देश रक्षणासाठी महार रेजिमेंटने अतुलनीय शौर्य दाखविले आहे. शौर्याची ही प्रेरणादायी परंपरा नव्या पिढीसमोर यावी, या हेतूने महाराष्ट्र शासनाने महार रेजिमेंटचा अमृत महोत्सव व शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित केला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महाराष्ट्रात महार रेजिमेंटचे गौरव स्मृती संग्रहालय उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महार रेजिमेंट अमृत महोत्सव शौर्य पुरस्कारप्राप्त सैनिकांचा गौरव समारंभ गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री ते बोलत होते.
या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले, माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार राज पुरोहित, भाई गिरकर, राहूल नार्वेकर आदी उपस्थित होते. यावेळी 51 शौर्य प्राप्त सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव समारंभ मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते झाला.

फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या अनेक किल्ल्यांची जबाबदारी महार समाजातील शूरवीरांकडे दिली होती. संभाजी महाराजांच्या संरक्षणासाठी महार योद्धे धावून गेले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजांना महार योद्‌ध्यांची शौर्यगाथा दाखवून महार रेजिमेंटची स्थापना करण्यास भाग पाडले.सैन्य दलासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने शहिद सैनिकांच्या कुटुंबांना 25 लाख रुपयांची मदत, जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)