#अर्थसंकल्प2019-20 : रोजगार, गुंतवणूक याविषयीच्या अर्थसंकल्पातील घोषणा

मुंबई : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने 27 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला होता. आता मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला. येत्या 2-3 महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे अतिरिक्त अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या.

रोजगार, गुंतवणूक याविषयीच्या अर्थसंकल्पातील घोषणा –

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था उद्दिष्ट साध्य करताना राज्यातील सर्वसामान्य जनता, उद्योजक, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, विविध क्षेत्रातील विषयतज्ञ या सर्वांचे सहकार्य अपेक्षित. -वित्तमंत्री

त्यादृष्टीने शास्त्रशुध्द व नियोजनबध्द पध्दतीने वाटचाल करताना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अर्थशास्त्रज्ञ, विशेषज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन आवश्यक. यासाठी महाराष्ट्र आर्थिक विकास परिषदेचे पुर्नरुज्जीवन करणार. 20 कोटीचा नियतव्यय -वित्तमंत्री

7 मार्च 2019 रोजी महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक धोरण जाहिर. राज्याला जागतिक स्तरामध्ये गुंतवणुकीचे उत्पादनाचे केंद्र बनवुन 10 लाख कोटी गुंतवणुक आकर्षित करुन त्यातुन 60 लाख नविन रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट-वित्तमंत्री

राज्यातील होतकरु युवक, युवतींसाठी राज्याची सर्वसमावेशक स्वयंरोजगारास प्रोत्साहन देणारा ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ सुरु करणार. योजनेंतर्गत यंदा जवळपास 10 हजार लघु उद्योग सुरु करण्याचे नियोजन -वित्तमंत्री

राज्यातील प्रत्येक तालुकास्तरावर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगाकरिता पार्क तयार करणार. सुरुवातीला पथदर्शी प्रकल्प म्हणून 50 तालुक्यांमध्ये सदर पार्कची निर्मिती प्रस्तावित. या योजनांसाठी रु.300 कोटी एवढा नियतव्यय-वित्तमंत्री

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here