२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास सरकार कटिबद्ध : मुख्यमंत्री फडणवीस  

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सतत विरोधकांच्या रडारवर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविधभागांमधील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधताना, “भाजप सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असून त्यासाठी सरकार निरंतर प्रयत्न करीत आहे.” असे आश्वासन दिले.

मित्र पक्ष शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि जेष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप सरकारवर लावला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केवळ, ‘शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, खाजगी कंपन्यांना नाही’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आमचं ध्येय शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे असून यासाठी आम्ही केंद्र आणि राज्यसरकारमध्ये समन्वय साधून शेतकरी हिताच्या विविध योजना राबवत आहोत. मला विश्वास आहे की आम्ही नक्कीच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवून दाखवू.” असं देखील ते यावेळी बोलताना म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)