मध्यप्रदेशातील रेवा आणि भिंड भाजपकडेच

भोपाळ: मध्यप्रदेशातील रेवा आणि भिंड या दोन मतदार संघातील मतमोजणी बराच काळ लांबली होती. शुक्रवारी पहाटे साडे तीनच्या सुमाराला या दोन्ही मतदार संघातील मतमोजणी संपली. त्यानुसार रेवा मतदार संघात भाजपचे विद्यमान खासदार जनार्दन मिश्रा यांनी कॉंग्रेसच्या सिद्धार्थ तिवारी यांचा 3 लाख 13 हजार 807 मतांनी पराभव केला. तर भिंड मध्ये भाजपच्या संध्या राय विजयी झाल्या. त्यांनी देवाशिष जरारीया यांचा 1 लाख 99 हजार 885 मतांनी पराभव केला. या निकालानंतर आता मध्यप्रदेशातील सर्व 29 मतदार संघांचे निकाल हाती आले असून त्यातील तब्बल 28 जागा भाजपने जिंकल्या आहेत. या राज्यातील कॉंग्रेसचा हा दारूण पराभव अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. कारण या राज्यात सहा महिन्यापुर्वीच भाजपला हरवून कॉंग्रेस पक्ष सत्तेत राज्यातील आला होता. पण या पराभवाच्या धक्‍क्‍यानंतर भाजपने केलेले कमबॅक लक्षणीय मानले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)