भोपाल – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज मध्यप्रदेश हे विजेच्या साठवणुकीची क्षमता असणारे देशातील पहिले राज्य बनणार असल्याची माहिती दिली. राज्यातील वीजपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारवर चांगलीच टीका झाली होती. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विजेची साठवणूक करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी राज्यसरकारने पावले उचलल्याचे माहिती दिली आहे.
विधानसभेमध्ये बोलताना मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सांगितले की, विजेची साठवणूक करणारी यंत्रणा उभारण्यासाठी जागतिक दर्जाच्या कंत्राटाची घोषणा करण्यात आली असून लवकरच चीन येथील तज्ज्ञ मंडळी राज्याच्या भेटीवर येणार आहेत.