मध्य प्रदेशातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांवरील राजकीय खटले मागे घेणार

भोपाळ: भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत कॉंग्रेस आणि अन्य राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जे खटले दाखल करण्यात आले आहेत ते राजकीय खटले मागे घेण्याचा प्रस्ताव आमच्या सरकारच्या विचाराधीन आहे अशी माहिती विधिमंडळ कामकाजमंत्री पी. सी. शर्मा यांनी आज पत्रकारांना दिली. त्याचबरोबर आंदोलनासाठी ज्या कामगांरांवर आणि युनियन नेत्यांवर खटले दाखल करण्यात आले आहेत ते खटलेही मागे घेतले जातील, असे ते म्हणाले.

राज्याच्या विधी विभागाच्या प्रमुखांशी आणि मुख्य सचिवांशी चर्चा करून याविषयीचा अधिकृत प्रस्ताव लवकरच तयार केला जाईल, असे ते म्हणाले. त्या प्रस्तावावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील. भाजप सरकारने ज्या पत्रकारांवर खटले दाखल केले आहेत ते खटलेही मागे घेण्याचा प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)