मंत्रीपद न दिल्याने मध्यप्रदेश काँग्रेसमध्ये फूट

भोपाल – मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या मंत्रिमंडळात समावेश न केल्याने काँग्रेस पक्षात फूट पडण्यास सुरूवात झाली आहे. मंत्री न बनविल्याने नाराज असलेले माजी मंत्री ऐदल सिंह कंसाना यांच्या समर्थानात काँग्रेस पक्षातून पहिला राजीनामा आला आहे. मुरैना जिल्ह्यातील सुमावली विधानसभेचे काँग्रेस कमिटी ब्लाॅक अध्यक्ष मदन शर्मा यांनी राजीनामा दिला आहे.

मुरैना-श्योपूर येथून 8 पैकी 7 जागा जिकंल्यानंतर जिल्ह्यातील एकाही उमेदवारास मंत्रीपद न दिल्याने शर्मा हे नाराज होते. त्यामुळे शर्मा यांनी  मुरैना जिल्ह्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शर्मा यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे पाठविला आहे. तसेच मदन शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर मुरैना जिल्ह्यातील बाकी काँग्रेस कार्यकर्ते सुध्दा पक्ष सोडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)