धक धक गर्ल माधुरी निवडणूकीच्या रिंगणात?

आगामी लोकसभा निवडणुकीची आतापासून रणधुमाळी सुरू झाली आहे. यात निवडणूकीत काही बॉलीवुडमधील कलाकारही नशीब आजमविण्याची शक्‍यता आहे. त्यात भाजपकडून अभिनेत्री माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

2014च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही भाजप सेलिब्रेटींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी भाजपने देशव्यापी सर्वेक्षणही केले आहे. या सर्वेक्षणानुसार बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितला सुद्धा भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्‍यता आहे.

-Ads-

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जून महिन्यात “संपर्क फॉर समर्थन’ या अभियानांतर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतरही माधुरीला भाजपकडून राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुका अजून काही महिने दूर आहेत. पण प्रत्येक पक्ष उमेदवारी कोणाला देणार यावरुन सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)