माधुरी दीक्षितची “टोटल धमाल’

बॉलीवूडमधील मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित दिर्घ काळानंतर पुन्हा एकदा सिल्वर स्क्रीनवर पुनरागमण करत आहे. तिच्या “टोटल धमाल’ चित्रपटाला बॉक्‍स ऑफिसवर चांगली ओपनिंग मिळली आहे. या चित्रपटात अनिल कपुरसोबत तिची जोडी आहे. याशिवाय अजय देवगण, रितेश देशमुख, जावेद जाफरी आणि अरशद वारसी आदी कलाकारांची फौज आहे.

माधुरीने प्रदिर्घ काळानंतर चित्रपटाच्या सेटवर सहकलाकारांसह शूटिंगचा आनंद घेतला. तसेच चित्रपटाच्या प्रमोशवेळीही माधुरी आपल्या को-स्टार्ससोबत मस्ती करताना दिसून येते. तिने आपल्या सहकलाकारांसोबत निर्माण केलेले णानूबंध तिच्या इंस्टाग्राम पोस्टवरून दिसून येते. माधुरीने अनिल कपूर, अजय देवगण, रितेश देशमुख आणि डायरेक्‍टर इंद्र कुमार यांच्यासोबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या व्हिडिओत सर्वजण एकमेकांना पकडत माधुरीकडे झुकताना दिसत आहे. तर माधुरी त्यांना पडताना वाचविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसते. या मजेदार व्हिडिओसोबत माधुरीने पोस्ट केले की, मुलांमध्ये एकटी मुलगी असतानाची वेळ खुपच मजेशीर राहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)