माधुरी दीक्षितच्या चाहत्यांची इच्छा होणार पूर्ण

“कंलक’ चित्रपटाच्या टीझरनंतर प्रदर्शित झालेल्या “घर मोरे परदेसिया’ या गाण्याला दर्शकांनी चांगलीच पसंती दर्शविली होती. या गाण्यात आलिया भट्‌ट पहिल्यांदाच क्‍लासिकल डान्स करताना दिसली. या गाण्यात माधुरीही झळकली आहे, पण तिचा जास्त डान्स नाही. त्यामुळे माधुरीचा डान्स पाहण्याची तिच्या चाहत्यांकडून इच्छा व्यक्‍त करण्यात येत होती. आता ही विश लवकरच पूर्ण होणार असल्याचे समजते.

“कलंक’ चित्रपटात माधुरी दिक्षितवर एक खास गाणे शूट करण्यात आले आहे. ज्यात तिचे चाहते तिच्या सदाबहार नृत्याचा आनंद घेवू शकतील. असे म्हटले जात आहे मी, चाहत्यांची विश पूर्ण करण्यासाठीच हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. सध्या या गाण्याचे टायटलपासून त्याच्या प्रदर्शनाची तारीख निश्‍चित झालेली नाही. पण माधुरीच्या चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, “कलंक’ हा एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे. यात आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर हे मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाच्या टीझर आणि पोस्टरच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या भूमिकांची झलक पाहण्यास मिळाली आहे. आता हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)