श्रीदेवीच्या गाण्यावर परफॉर्म करणार माधुरी दीक्षित 

बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर याच्या “कलंक’ चित्रपटात श्रीदेवी झळकणार होती. मात्र, त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी माधुरी दीक्षितला संधी देण्यात आली. आता “गोल्डन रोज अवार्डस्‌’मध्ये ड्रिम गर्ल श्रीदेवी यांना श्रद्धाजंली देण्यासाठी माधुरी दीक्षित खास परफॉरमेंस देणार आहे.

या बक्षिस सोहळ्यात माधुरीकडून श्रीदेवीला विशेष श्रद्धांजली देण्यात येणार आहे. यात माधुरी श्रीदेवी यांच्यासह हेमा मालिनी आणि रेखा यांच्या गाण्यावरही परफॉर्म करणार आहे. पण, श्रीदेवी यांच्या गाण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यात श्रीदेवी यांच्या हिम्मतवाला, मिस्टर इंडिया या चित्रपटातील हिट गाण्यांचा समावेश आहे.

-Ads-

याबाबत माधुरीने दिलेला एका मुलाखतील म्हटले की, या परफॉरमेंसबाबत मला अप्रोच करण्यात आले, तेव्हा मी खुपच आनंदीत झाले. यातून बॉलीवूडमधील महिलांचे सशक्‍तिकरणाची मला संधी मिळाली असल्याचे वाटते. तसेच श्रीदेवी, हेमाजी आणि रेखाजी यासारख्या दिग्गज अभिनेत्रींच्या गाण्यांवर परफॉर्म करण्याची संधी मिळाली. हा परफॉरमेंस पाहून निश्‍चितच त्यांच्या चाहत्यांना आनंद होईल.

दरम्यान, या अवार्ड शोमध्ये जान्हवी आणि ईशानही परफॉर्म करणार आहेत. तसेच दरवर्षीप्रमाणे होस्टिंग करताना बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरूख खान झळकणार असून त्याच्यासोबत वरूण धवनही आहे. या शोमध्ये आयुष्मान खुरानाही सहभागी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)