माधुरी दीक्षित लॉंच करणार डान्स चॅनेल 

माधुरी दीक्षित नेनेला नृत्याचे किती वेड आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येक व्यक्‍तीमध्ये एक डान्सर आहे. प्रत्येकाला जर डान्सची संधी मिळाली तर प्रत्येकाच्या अभिव्यक्‍तीचे दर्शन घडू शकेल, असे तिला वाटते. सध्या ती “डान्स विथ माधुरी’ या ऑनलाईन डान्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नवीन नवीन कलाकारांना संधी देयाचे काम करते आहे. सर्व विषयांसाठीचे चॅनेल आहेत. मात्र डान्ससाठी कोणतेही चॅनेल नाही.

ही उणीव भरून काढण्याचे माधुरीने ठरवले आहे. “लेट्‌स डान्स’ नावाचे चॅनेल सुरू करण्याचा निर्णय माधुरीने घेतला आहे. या चॅनेलच्या माध्यमातून लोक आपल्या लिव्हींग रूममध्येच राहून डान्स शिकू शकतील, असा विश्‍वास तिला वाटतो आहे. त्यामुळे हे चॅनेल सुरू करण्याबाबत माधुरी खूपच एक्‍साईटेड आहे.

या चॅनेलवर कोणत्याही जाहिरातीशिवाय सलग 150 तास डान्सचे 170 पेक्षा अधिक परफॉर्मन्स होणार आहेत. या चॅनेलवर माधुरीबरोबरच बॉलिवूडमधील अनेक डान्स मास्टर लोकांना डान्सचे बारकावे समजावून सांगणार आहे. तिच्या या चॅनेलमुळे तरुणांना घरबसल्या डान्सच्या टिप्स मिळतील आणि नवीन कलाकार तयार होण्यास मदतही होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)