माढ्यात राष्ट्रवादीला धक्का; भाजप आघाडीवर 

माढा – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे विशेष लक्ष असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची अग्नीपरीक्षा सुरू आहे. भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी ४,८१५ मतांनी आघाडीवर आहेत.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आतापर्यंत  151972  तर राष्टवादीचे उमेदवार संजय शिंदे यांना 149365 मते मिळाली आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयराव मोरे 15248 मते मिळाली आहेत.

संजय शिंदे खरे तर भाजपचे नेते. वास्तविक पाहता गेल्या चार वर्षांपासून संजय शिंदे यांना माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली होती. पण संजय शिंदे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपची पंचाईत झाली आणि उमेदवारी कुणाला द्यायची याचा घोळच सुरू झाला. रोज एका नव्या उमेदवाराचे नाव चर्चेत यायचे आणि हवेत विरूनही जायचे. त्यामुळे माढ्यातील पक्षाचे कार्यकर्ते अस्वस्थ होते. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. थोडक्‍यात माढा हा मतदारसंघ कुणालाच सोपा राहिला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)