एम जे अकबरांचा राजीनामा ?

परदेश दौऱ्यावरुन तातडीने बोलावले
नवी दिल्ली: “मी टू’मोहीमेंतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपांमध्ये अडकलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सरकारने त्यांना नायजेरिया दौरा आटोपून तातडीने भारतात परत येण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, अकबर राजीनामा देण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली असून अकबर यांच्यावर कठोर कारवाई करु शकते. तर वैयक्तिक कारण देऊन अकबर राजीनामा देऊ शकतात. तसेच अकबर भाजपच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा आहे.
पत्रकार प्रिया रमानी यांनी एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम. जे. अकबर यांचे पत्रकारिता क्षेत्रात मोठे नाव आहे. त्यांचे नाव, सन्मान आणि कार्यामुळे त्यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. आता पत्रकार प्रिया रमानी यांनी शोषणाचे आरोप केल्याने माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
एम जे अकबर यांच्यावरील आरोपांनंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेसने अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सरकार आणि पक्षाचे वरिष्ठ अधिकारी अकबर यांच्या भविष्याबाबत विचार करतील. तर त्यांचे स्पष्टीकरणही महत्त्वाचे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. कोणताही निर्णय घेण्याआधी पूर्ण विचार केला जाईल. विचार न करता कोणताही निर्णय आम्हाला घ्यायचा नाही. ही महिला सुरक्षेशी संबंधित बाब आहे, जी पंतप्रधानांसाठी महत्त्वाची आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे सूत्रांनी सांगितले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)