शेअर निर्देशांकात अल्प वाढ; पतधोरणाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष 

खरेदी आणि विक्रीच्या लाटा 

मुंबई: निवडणुकाबरोबरच या आठवड्यात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडणार असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्यामुळे शेअरबाजारात खरेदी विक्रीच्या लाटा येत आहेत. आज सकाळी निर्देशांकांत मोठी वाढ झाली होती. मात्र, नंतर नफेखोरी झाल्यामुळे निर्देशांकांना ती पातळी राखता आली आहे. तरीही निर्देशांक शुक्रवारच्या तुलनेत वाढले.

सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 46 अंकांनी वाढून 36241 अंकावर बंद झाला राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 7 अंकांनी वाढून 10883 अंकावर
बंद झाला.

या आठवड्यात निर्देशांकाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. शुक्रवारी कमी झालेल्या विकासदराची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याबरोबर वाहन विक्री कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. अमेरिका आणि चीनने व्यापार युद्धाला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे. मात्र म्हणजे नेमके काय केले आहे याचा अंदाज गुंतवणूकदार घेत आहेत.

सोमवारी वाढलेला मॅन्युफॅक्‍चरिंग पीएमआय जाहीर झाला आहे आणि सेवा क्षेत्राचा लवकरच जाहीर होणार आहे. त्यावरून या दोन क्षेत्रांच्या उत्पादकतेचा अंदाज गुंतवणूकदाराना येणार आहे. 5 तारखेला रिझर्व्ह बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. व्याजदर “जैसे थे’ राहण्याची शक्‍यता असली तरी त्याकडे गुंतवणूकदार लक्ष देण्याची शक्‍यता आहे.

क्रुडच्या उत्पादनावर तेल उत्पादक देश काय निर्णय घेतात याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असणार आहे. या आठवडयात निवडणुकांचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. त्यात मतदाराचा कल कोणाच्या बाजूने असेल याकडेही गुंतवणूकदार लक्ष देणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात निर्देशांक फारच संवेदनशील राहण्याची शक्‍यता ब्रोकर्सना वाटते. कारण अनेक अनिश्‍चित बाबीवर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)