व्हॉट्‌सऍपमुळे एकटेपणा कमी जाणवतो !

नवी दिल्ली -समाजमाध्यमांवर विशेष करून व्हॉट्‌सऍपवर जे लोक जास्त वेळ घालवतात त्यांना एकटेपणा कमी जाणवतो व त्यांचा आत्मसन्मान वाढतो असा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

ब्रिटनमधील एज हिल विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, व्हॉट्‌सऍपवर लोक जितका जास्त वेळ घालवतात तितके त्यांना मित्र व कुटुंबासमवेत असल्यासारखे वाटते त्यांना ते आभासी नातेसंबंध चांगल्या दर्जाचे वाटतात. यातील व्हॉट्‌सऍप समूहात लोक नाते व मैत्रीत बांधले जातात. त्यामुळे त्यांचा आत्मसन्मान व सामाजिक सक्षमता वाढते.

चोवीस वर्षे वयोगटातील 158 महिला व 41 पुरुष यांचा अभ्यास यात करण्यात आला. साधारणपणे यातील लोक रोज पंचावन्न मिनिटे व्हॉट्‌सऍपचा वापर करीत होते, व्हॉट्‌सऍपची लोकप्रियता व त्यातील गप्पांची सोय यामुळे त्याचा वापर एकूणच समाजात जास्त आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)