सीबीआयकडून चंदा कोचर यांना लूकआऊट नोटीस

नवी दिल्ली: व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात दोषी आढळलेल्या चंदा कोचर, त्यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे एमडी वेणूगोपाळ धूत यांच्याविरोधात सीबीआयने आज लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या तिघांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सीबीआयने सर्व विमातळांवरील इमिग्रेशन विभागाला तशी माहिती दिली आहे.
ही कारवाई गुन्हा दाखल झाल्यानंतर एका आठवड्याने सीबीआयकडून करण्यात आली आहे.

चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने 22 जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. पदांचा गैरवापर करत मर्जीतील लोकांना आर्थिक फायदा दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. यात चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात चंदा कोचर दोषी ठरल्या असून त्यांच्यावर बॅंकेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आयसीआयसीआय बॅंकेच्या अंतर्गत चौकशी समितीने हा निष्कर्ष काढला आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बॅंकेत सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर होत्या.

आयसीआयसीआय बॅंकेने वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन समूहाला 1,875 कोटींचे कर्ज दिले. त्याबदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत 64 कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप होता. यापुढे चंदा कोचर यांना बोनससह अन्य भत्ते देण्यात येणार नाहीत, असे आयसीआयसीआय बॅंकेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)