वाकडला शहरीकरणाचा लूक

आधीच कपात, त्यात कमी दाबाने पाणीपुरवठा वाकड, पिंपळे सौदागर परिसरात टॅंकरने पाणी

काय हव्या सुविधा

आरक्षणांचा विकास करणे गरजेचे
रस्त्यांच्या विकासाला द्यावे प्राधान्य
स्वच्छतागृह, कचराकुंड्यांची गरज

आरक्षित 26 हेक्‍टर क्षेत्राचा ताबा बाकी

वाकड परिसरात 50 आरक्षणे टाकली आहेत. त्यांचे एकूण क्षेत्र 35.18 हेक्‍टर इतके आहे. त्यातील आत्तापर्यंत 9.26 हेक्‍टर क्षेत्राचाच ताबा महापालिकेला मिळाला आहे. 25.92 हेक्‍टर क्षेत्राचा ताबा मिळणे अद्याप बाकी आहे.

पिंपरी – वाकडचा चेहरामोहरा सध्या बराच बदलला आहे. गावाला शहरीकरणाचा “लूक’ मिळाला आहे. गावामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, शाळा, दवाखाना आदी विविध सुविधा झाल्या आहेत. येथील गृहनिर्माण सोसायट्यांना भेडसावणारा पाणी प्रश्‍न मात्र ज्वलंत आहे. त्याबाबत तातडीने उपाययोजना होणे आवश्‍यक आहे.

वाकडचा भाग हा दोन टप्प्यांमध्ये महापालिका हद्दीत समाविष्ट झाला. 1982 मध्ये महापालिका आणि प्राधिकरणाकडे वाकडचा अर्धा भाग विभागलेल्या स्थितीत होता. वाकड गावठाण, कस्पटे वस्ती आदी प्रमुख भागाचा त्यामध्ये समावेश आहे. 1997 मध्ये वाकड गावठाणापलिकडील हिंजवडी हद्दीपर्यंतचा भाग महापालिकेत समाविष्ट झाला. तर, प्राधिकरणाकडे यापूर्वी विभागलेला भाग देखील महापालिकेच्या नियंत्रणाखाली आला. वाकडचा त्यामुळे दोन टप्प्यात विकास झाला. गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे लोकसंख्या वाढली आहे. पर्यायाने, नागरी सुविधांच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. येथे सर्वाधिक ज्वलंत प्रश्‍न पाण्याचा जाणवतो आहे.

परिसराला पाणी समस्येने ग्रासले आहे. त्यातही विशेषत: नव्याने झालेल्या गृहप्रकल्पांना पाणी पुरत नसल्याने चक्क खासगी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दहावीपर्यंत महापालिकेच्या शाळेची सोय व्हायला हवी. परिसरासाठी उद्यान, स्मशानभूमी, कावेरीनगर परिसरात भाजी मंडई आदी सुविधा आहेत. छत्रपती चौक येथे मात्र रस्त्यावर भाजी विक्रेते बसतात. त्यांना बसण्यासाठी हॉकर्स झोनची व्यवस्था व्हायला हवी. पवना नदीपात्र प्रदुषित असल्याने नागरिकांना डासांचा उपद्रव होतो. त्यासाठी नियमित औषध फवारणी आवश्‍यक आहे, अशी मागणी महेश कुंभार, संतोष कस्पटे यांनी केली आहे.

..तर जलतरण तलावांचे पाणी बंद

महापालिकेतर्फे सध्या जलतरण तलावांना देखील दिवसाआड पाणी दिले जात आहे. बांधकामांसाठी महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जात नाही. जलतरण तलाव असलेल्या परिसरात जर पाणी पुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली तर संबंधित भागातील जलतरण तलावांना दोन दिवसाआड किंवा पाणीपुरवठाच बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासन घेणार आहे. वॉशिंग सेंटरला बोअरवेलचे पाणी वापरले जात असल्याची माहिती आहे.

 

पाणीपुरवठा, रस्ते आदी समस्या वाकडमध्ये होत्या. त्या समस्या सध्या सुटत आल्या आहेत. वाकड- हिंजवडी रस्ता, नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्ता आदी रस्त्यांची कामे झालेली आहेत. वाकड परिसरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टाकी उभारली जात आहे.

कमल कलाटे, माजी नगरसेविका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)