लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

पुणे – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध भागातील स्थानिक मंडळे आणि कार्यकर्ते मिरवणूक काढतात. सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी ते येतात. त्या पार्श्‍वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

जेधे चौक ते सारसबाग हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असेल. फायर ब्रिगेड, पोलीस तसेच रुग्णवाहिका याखेरीज इतर वाहनांना वाहतुकीसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत.

-Ads-

पर्यायी रस्ता: जेधे चौकाकडून सिंहगड रोडला जाण्यासाठी होल्गा चौक-मित्रमंडळ चौक-सावरकर चौक.
सिंहगड रोडकडून स्वारगेटकडे जाण्यासाठी सावरकर चौक-मित्रमंडळ चौक-व्होल्गा चौक-जेधे चौक या मार्गाचा वापर करावा.

“वाय जंक्‍शन’ उड्डानपुलावरून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी रस्ता : कात्रजकडून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी उड्डानपूलावरून न जाता पुलाखालून लक्ष्मीनारायण चौकातून डावीकडे वळून इच्छित स्थळी जावे.

पुरम चौक ते जेधे चौक या रस्त्यावरील एकेरी मार्गात वाहनांना आवश्‍यकतेनुसार सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देऊन दुहेरी प्रवेश देण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतुक शाखेतर्फे करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)