#LokSabhaElections2019 : नवरदेव पोहचला मतदानाला!

मनाली – सतराव्या लोकसभेसाठीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान सुरु आहे. मतदानासाठी सर्व सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून, कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. सात राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 59 जागांसाठी हे मतदान होत आहे. देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारराजा मतदान करुन आपलं कर्तव्य निभावत आहे.


अशातच हिमाचल प्रदेशातील या मतदाराची चर्चा सोशल मिडीयावर झाली. मनाली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्रावर लग्नाआधी नवरदेव मतदानासाठी पोहचला. तेव्हा नवरदेवाचा वेश पाहून उपस्थित मतदार आणि मतदान केंद्रावरील अधिकारी आश्चर्यचकीत झाले.


तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील डमडम लोकसभा मतदारसंघासाठी एका मुलाने आपल्या 80 वर्षीय आईला उचलून मतदान केंद्रावर आणलं. त्यानंतर या आईने आपला मतदानाचा हक्क बजावला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)