नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा उमेदवारी अर्ज 26 एप्रिलला वाराणसीतून दाखल करणार आहेत. भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात पोहोचतील. त्यानंतर तिथे ते रोड शो करतील. त्याचप्रमाणे बनारास हिंदू विद्यापीठालाही भेट देतील.
रोड शोनंतर मोदी काळभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतील तिथे पूजाअर्चा करतील. त्यानंतर गंगा आरतीही करतील. तसेच 25 एप्रिलचा उर्वरित दिवस ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत घालवतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
2014 मध्ये प्रचाराच्या वेळी मोदी यांनी अशाच प्रकारे रोड शो घेतले होते. विजयानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत विजय रॅली काढली होती. वाराणसीत सातव्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी मतदान होणार आहे.