दिल्ली-हरियाणात काँग्रेस आणि आपमध्ये युती नाही – संजय सिंह

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली – आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीबाबत मोठी बातमी आली आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षात दिल्ली-हरियाणामध्ये युती होणार नाही. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संजय सिंह यांनी सांगितले आहे की, ‘युती होईल अशी कोणतीही आशा राहिलेली नाही, त्यामुळे दिल्ली-हरियाणामध्ये आम आदमी पक्ष आपल्या हिमंतीवर निवडणुक लढवणार आहे.

आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह म्हणाले की, ‘भाजपाला रोखण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत युती करण्यासाठी तयार होतो, मात्र काँग्रेस युती करण्याच्या मूडमध्ये नाही. हा अतिशय दु:खाी बाब आहे की, आमच्या अनेक प्रयत्नानंतरही काँग्रेस कोणतीही तडजोड करायला तयार नाही’.

दरम्यान, काही दिवसापासून अशी चर्चा होती की, आम आदमी आणि काँग्रेसमध्ये युती होणार, पंरतु सारखंच दोन्ही पक्षामध्ये हो-नाही असंही चालू होतं. त्यातच आजही अशी बातमी आली होती की, काँग्रेस आणि आम आदमीमध्ये दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड याठिकाणी एकूण 18 जागेवर युती झाल्याच निश्चित झालं आहे. यावरून दिल्लीत काँग्रेस 4 आणि आम आदमी 3 जागेवर लढणार असल्याचं सांगितल जात होतं. मात्र संजय सिंह यांच्या स्पष्टीकरणानंतर आम आदमी आणि काँग्रेस यामध्ये आता युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here