Loksabha Bypoll : पालघर, भंडारा-गोंदियात मतदान सुरू

संग्रहित छायाचित्र

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी दोन्हीकडे जय्यत सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या दोन्ही जागा टिकवण्याचं आव्हान भाजपपुढं आहे.

विदर्भातील ओबीसी नेते नाना पटोले यांनी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात तर, भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्याने पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पालघरमध्ये तर सत्ताधारी भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष परस्परांविरोधात मैदानात उतरले आहेत. अचानक शिवसेनेत दाखल झालेले वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे, तर भाजपने कॉंग्रेसच्या राजेंद्र गावित यांना आपल्याकडे खेचत निवडणूक रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसने माजी खासदार दामोदर शिंगडा यांना, तर आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने माजी खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)