राजेंद्र गावित यांचा शिवसेनेत प्रवेश; श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट

मुंबई – सोमवारी राजेंद्र गावित यांनी मातोश्री वर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता पालघरमधून राजेंद्र गावित हेच लोकसभेचे उमेदवार असणार आहेत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे पालघरची जागा शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे राहणार हा सस्पेन्स अखेर दूर झाला आहे.

शिवसेनेनं जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये मात्र पालघरचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नव्हता. मात्र आज पालघरमधून राजेंद्र गावित हेच लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे पालघर मतदारसंघात पोटनिवडणुक झाली होती. त्यावेळी श्रीनिवास वनगा यांनी भगवा हाती घेत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना पराभूत केले होते. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित राजेंद्र गावित यांनी 44 हजार 500 मतांनी विजय मिळवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)