लाल वादळ पुन्हा मुंबईच्या दिशेने

गिरीश महाजन यांची शिष्टाई निष्फळ : आंदोलक लेखी आश्वासनावर ठाम

नाशिक  – मुंबईत पुन्हा एकदा शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे लाल वादळ धडकण्याची चिन्हे आहेत. किसान सभेचा मोर्चा पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाला आहे. काल मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र आंदोलक लेखी आश्वासनावर ठाम आहेत. हा मोर्चा गुरुवारी मुंबईच्या दिशेने रवाना झाला. या मोर्चात सुमारे साडे सात हजार आदिवासी शेतकरी सहभागी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गतवर्षी नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देत मागण्या मान्य केल्या. त्यास वर्ष होत आले तरी अद्याप काही मागण्या बाकी असल्याचे किसान सभेचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चेकऱ्यांशी वाटाघाटी करण्यासाठी महाजन यांनी बुधवारी नाशिकमध्ये धाव घेतली. त्यांनी आंदोलकांशी तीन तास चर्चा केली. मात्र, या भेटीत तोडगा निघू शकला नाही.

किसान मोर्चाचे प्रमुख अशोक ढवळे म्हणाले, शेतक-यांनी केलेल्या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. शेतक-यांना कर्जमाफी देणे, कृषीमालाला योग्य हमीभाव देणे, सिंचन सुविधा पुरविणे असा विविध मागण्या प्रलंबित आहे. त्या पूर्ण करण्यात सरकारला अपयश आले आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी किसान सभेचे पदाधिकारी मोर्चा काढण्यावर ठाम होते. अखेर गुरुवारी सकाळी नाशिकमधून मोर्चाने मुंबईकडे प्रस्थान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)