लोकेश राहुलची विश्‍वक्रमवारीत सर्वोत्तम कामगिरी

आयसीसी टी-20 फलंदाजांच्या मानांकनात तिसऱ्या स्थानी झेप

दुबई: भारताच्या लोकेश राहुलने आयसीसीच्या टी-20 क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंचने पहिले, तर पाकिस्तानच्या फखर झमानने दुसरे स्थान निश्‍चित केले आहे.

झिम्बाब्वेत पार पडलेली तिरंगी टी-20 मालिका, तसेच भारत-इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या टी-20 मालिकेनंतर आयसीसीने नवी विश्‍वक्रमवारी जाहीर केली असून त्यानुसार केवळ लोकेश राहुल हा पहिल्या 10 खेळाडूंमधील एकमेव भारतीय आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या सामन्यात लोकेश राहुलने शतकी खेळी केली होती, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात लोकेश राहुलला फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नसल्यामुळे त्याला 812 गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र आपल्या याआधीच्या कामगिरीत सुधारणा करत लोकेश राहुलने क्रमवारीत नऊ क्रमांकांनी प्रगती केली आहे.

तर दुसरीकडे ऍरॉन फिन्चने 900 मानांकन गुणांचा टप्पा ओलांडणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान मिळविताना विश्‍वविक्रमी कामगिरी केली आहे. फिंचने झिम्बाम्बे विरुद्धच्या सामन्यात 176 धावांची तुफानी खेळी करत अनेक विक्रम प्रस्थापित केले होते. त्यामुळे त्याच्या खात्यात जास्तीचे गुण जमा झाले आणि त्यामुळे त्याने 900 गुणांचा टप्पा ओलांडताना क्रमवारीत पहिले स्थान मिळवले.

आयसीसीची नवीन टी-20 क्रमवारी पुढीलप्रमाणे असेल- 1) ऍरोन फिंच (891 गुण), 2) फखार झमान (842 गुण), 3) लोकेश राहुल (812 गुण), 4) कॉलिन मन्‍रो (801 गुण), 5) बाबर आझम (765 गुण), 6) ग्लेन मॅक्‍सवेल (761 गुण), 7) एविन लुईस (753 गुण), 8) मार्टिन गप्टील (747 गुण), 9) ऍलेक्‍स हेल्स (710 गुण) व 10) डार्सी शॉर्ट (690 गुण).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)