लोकसभा निवडणूक : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने बजावला मतदानाचा हक्क

मुंबई – लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात देशातील 9 राज्यांतील 72 मतदारसंघात सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडत असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांचा समावेश आहे. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे. यावेळी सेलिब्रिटींनीही मागे न राहता उस्फुर्तपणे मतदान केले. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावत मतदान केल्याचे दिसून येत आहे. बॉलिवूड मधील किंग खान शाहरुख खानने देखील बांद्रा येथील मतदान केंद्रावर पत्नी गौरी सह आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

https://twitter.com/ANI/status/1122820674391814146

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)