लोकसभा निवडणूक Live : मतदानावर उन्हाचा परिणाम; गर्दी ओसरली

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील14 मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या मतदारसंघातून 249 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होणार आहे. या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय मतदान केंद्र. कोथरूड- खडकवासला मतदारसंघ
उन्हामुळे गर्दी कमी झाली..
दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्यात एकूण  १३.८० टक्के तर बारामतीत  एकूण १७.४६ टक्के मतदान झाले आहे.
प्रवीण तरडे आणि सलील कुलकर्णी यांनी मतदानाचा हक्क बजावला
पहिल्यांदाच मतदान करण्यासाठी खूप उत्सुकता होती. मतदानाचा केल्याचा खूप आनंद होत आहे.- जीनल गोहेल
राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी मतदान केले.
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अहमदनगरमधील राळेगणसिद्धी येथे मतदानाचा हक्क बजावला.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पत्नीसह मतदान केले.

 

अनिल शिरोळे यांनी पत्नी माधुरी शिरोळे यांच्यासह मतदान केले.
राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी रामोशी गेट मतदान केंद्र येथे मतदान केले
गोखलेनगर येथील दीप बंगला चौक मतदार संघात आयुक्तांनी भारतीय विद्याभवन शाळेत मतदानाचा हक्क बजावला

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)