बसपाचा बिहारमध्ये महागठबंधला झटका ; 40 जागा स्वतंत्र लढण्याचा निर्णय

नवी दिल्ली: लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी बहुजन समाज पार्टीने (बसपा) बिहारमध्ये महागठबंधनला झटका दिला आहे. मध्य प्रदेश नंतर आता बिहारमध्ये बसपाने कॉंग्रेस नेतृत्वाखालील महागठबंधनातून बाहेरचा रस्ता पकडला आहे. बसपाने ४० जागांवर स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.

बसपाने राज्यात सर्व 40 जागांसाठी उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. यासाठी, बसपाचे अध्यक्ष मायावती यांनी दिल्लीत राज्य नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. बसपाचे राज्य अध्यक्ष भरत बिंद यांनी सोमवारी सांगितले की, पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी जाहीर केलेल्या निर्देशानुसार बिहार लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष 40 जागांवर लढत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते समोर म्हणाले, संपूर्ण राज्यात बसपाचे समर्थन आणि सक्रियता वाढवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. उमेदवारांची निवड लक्षात घेऊन पक्षप्रमुख मायावती यांनी 28 फेब्रुवारी रोजी दिल्लीत बिहार नेत्यांची एक बैठक बोलावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)