लोकसभा निवडणूक २०१९ : अशोक चव्हाण निवडणूक लढवणार नाहीत?

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ साठी जवळपास सर्वच पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. सर्व पक्ष आपल्या उमेदरांच्या आता पर्यंतचे कार्याची चाचपणी ही करीत आहे. यातच मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लढवणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांवर काँग्रेसने प्रचार महत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. तसेच 2019 निवडणुकीमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असू शकतात. 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेत राज्यात फक्त दोन जागा निवडून आल्या होत्या. ज्यामध्ये अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. येत्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आजपासून 17 तारखेपर्यंत तीन दिवस बैठक सत्राला सुरुवात होत आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
218 :thumbsup: Thumbs up
433 :heart: Love
6 :joy: Joy
37 :heart_eyes: Awesome
29 :blush: Great
2 :cry: Sad
18 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)