पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80.16 टक्के मतदान
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज देशभरातील 59 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले आहे. अनेक बडे चेहरे रिंगणात असल्याने सहाव्या टप्प्याबाबत मोठी उत्सुकता आहे.
सहाव्या टप्प्यात उत्तरप्रदेश (14 जागा), हरियाणा (10 जागा), झारखंड (4 जागा) बरोबरच बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8 जागांसाठी मतदान पार पडले . सहाव्या टप्प्यात सांयकाळी 7.00 वाजेपर्यंत एकूण सरासरी 61.14 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
सांयकाळी 7.00 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
पश्चिम बंगाल – 80.16 %
झारखंड – 64.46 %
हरियाणा – 62.91 %
मध्यप्रदेश 60.40 %
बिहार – 59.29 %
दिल्ली – 56.11 %
उत्तर प्रदेश – 53.37 %
Lok Sabha Election 2019: Total 61.14% voting till 7 pm in #Phase6. West Bengal- 80.16, Delhi-56.11, Haryana- 62.91, Uttar Pradesh- 53.37, Bihar- 59.29, Jharkhand- 64.46, Madhya Pradesh- 60.40 pic.twitter.com/XQbDd1NWHL
— ANI (@ANI) May 12, 2019
त्याशिवाय, दिल्लीतील लोकसभेच्या सर्व 7 जागा निवडून देण्यासाठी मतदारांनी त्यांचा हक्क बजावला आहे. या टप्प्यात 10 कोटींहून अधिक मतदार त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी पात्र आहेत. लोकसभेच्या 59 जागांसाठी एकूण 979 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत.