लोकसभा आणि जम्मू-काश्‍मीर विधानसभा निवडणुका एकत्रितच?

नवी दिल्ली: पुढील वर्षी लोकसभा आणि जम्मू-काश्‍मीर विधानसभा निवडणुका एकत्रितच होण्याची शक्‍यता आहे. त्या निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे सूतोवाच गुरूवारी निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी केले.
जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर 21 नोव्हेंबरला त्या राज्याची विधानसभा बरखास्त केली. त्यामुळे त्या राज्यात पुढील वर्षीच्या 21 मेपूर्वी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य बनले आहे. त्याच कालावधीत लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियाही पार पडणार आहे. त्यामुळे जम्मू-काश्‍मीरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याचा विचार पुढे आला आहे.

तो विचार करताना प्रामुख्याने सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा ठरत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जम्मू-काश्‍मीरात सुरक्षा दले तैनात केली जातील. त्यामुळे त्याच काळात विधानसभा निवडणुकही घेणे सोईचे ठरेल, असे निवडणूक आयोगाबरोबरच केंद्र सरकारला वाटत आहे. जम्मू-काश्‍मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती तसेच केंद्रीय सुरक्षा दलांचा अभाव आदींमुळे तिथे मागील वर्षापासून निवडणूक आयोगाला अनंतनाग लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेणे शक्‍य शक्‍य झालेले नाही याकडे लक्ष वेधले जात आहे. देशात फक्त जम्मू-काश्‍मीर विधानसभेची मुदत सहा वर्षे आहे. लोकसभात आणि देशातील इतर राज्यांमधील विधानसभांची मुदत पाच वर्षे इतकीच आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)